अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत मारहाण


धरणगाव : गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिला मारहाण करण्यात आल्याची घटना शहरात 15 रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
धरणगावातील एका भागातील रहिवासी असलेल्या 16 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, शनिवार, 15 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास शहरातील एका ठिकाणी संशयित समाधान संतोष जाधव (35, धरणगाव) हा पीडीतेचा पाठलाग करीत आला व तू माझ्याशी बोलण्या-चालण्याचे संबध ठेव, असे सांगू लागल्याने पीडीतेने मी तुझ्याशी कशाला बोलू व तू पण माझ्याशी बोलू नको, असे सांगितल्याने समाधान याने पीडीतेचे हात आणि केस पकडून चापटा-बुक्कयांनी मारहाण केली. एव्हढेच नव्हे तर त्याच्या घरापर्यंत घेऊन गेला तसेच इंदूबाई संतोष जाधव यांनीदेखील पीडीतेला चापटाबुक्यांनी मारहाण करीत शिविगाळ केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास परीवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !