जळगावातील आगीत 20 लाखांचे नुकसान


20 lakhs loss in fire in Jalgaon जळगाव  : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश प्लास्टिक कंपनीत शार्टसर्कीटमुळे सोमवारी पहाटे सहा वाजता आग लागली होती. या आगीत आगीत कच्चा माल व मशिनरी जळून खाक झालयाने या आगीत सुमारे अंदाजे 20 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून या प्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

आगीत 20 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज
जळगाव एमआयडीसीतील जी -सेक्टर मधील आकाश प्लास्टिक कंपनीत सोमवार, 17 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास कंपनीला शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीत प्लास्टिक बनविण्याचा कच्चा माल आणि मशिनरी जळाली. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचा अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. यावेळी पथकाने अथक परीश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत अंदाजे 20 लाखांचे अंदाजे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून व्यापारी खंडू किसन पवार (अयोध्या नगर, जळगाव) यांच्या खबरीवरून गुरूवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विजय पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !