कानळदा गावातील 22 वर्षीय तरुणाची चिकूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या


जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील 22 वर्षीय तरुणाने कुठल्यातरी कारणाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल. ही घटना शुक्रवार, 21 रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राहुल रवींद्र सोनवणे (22, कानळदा) असे मयत तरुणाचे नाव आहे.

शेतात जात केली आत्महत्या
शेती काम करणार्‍या राहुल याने गुरुवारी सायंकाळी नारायण राणे यांच्या तशेतामध्ये जाऊन चिकूच्या झाडाला गळफास घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी सहा वाजता शेतमजूर शेतात कामाला गेल्यानंतर गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांनी राहुल सोनवणेचा मृतदेह खाली उतरून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे रवाना केला. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत राहुल सोनवणे यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परीवार आहे. ज





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !