जळगावात भरधाव दुचाकी धडकल्या, तरुण गंभीर ; दुचाकीचे नुकसान


जळगाव  : शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाजवळ दोन दुचाकींमध्ये धडक झाल्याने पिंप्राळ्यातील तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी घडली. अपघातात दुचााकीचे मोठे नुकसान झाले असून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात दुचाकीधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
हमीद शेख मोहम्मद शफी (38, पिंप्राळा हुडको, जळगाव) हा तरूण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी हमीद शेख हा त्याच्या दुचाकीने नुतन मराठा महाविद्यालयाजवळून जात असतांना समोरून अज्ञात दुचाकीधारकाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात हमीद शेख हा गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. या अपघात प्रकरणी गुरूवारी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार संगीता खांडारे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !