मी आत्ताच खुनाच्या गुन्ह्यातून सुटलो, तुम्ही पोलीस माझे काहीही करू शकत नाही : चिंग्याची जळगाव पोलीस ठाण्यात कर्मचार्‍यालाधमकी


I just got away with the crime of murder, you police can’t do anything to me: Chingya threatens staff at Jalgaon police station जळगाव : कट्टर विरोधकाला दवाखान्यात उपचारार्थ हलवण्याच्या रागातून खुनातील संशयित चिंग्या उर्फ चेतन सुरेश आळंदे (गणेशवाडी, पांडे चौक, जळगाव) याने आसोद्यातील योगेश डिगंबर कोळे या तरुणावर तीन गोळ्या झाडल्या होत्या मात्र सतर्कतेने तरुण बचावला होता. आरोपी चिंग्याला अटक केल्यानंतर पोलीस त्याची चौकशी करीत असताना जळगाव तालुका पोलीस ठाण्यातच आरोपीने एका पोलीस कर्मचार्‍याची कॉलर पकडत त्यास मी आत्ताच खुनाच्या गुन्ह्यातून सुटलो, तुम्ही पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाही, अधी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला.

पोलिसांनाच धमकी दिल्याने खळबळ
आसोदा येथील गोळीबार प्रकरणातील संशयीत आरोपी तथा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार चेतन आळंदे याला गोळीबार घटनेबाबत निरीक्षक रामकृष्ण कुंभार व पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील विचारपुस करीत असताना त्याच्यावर लक्ष ठेवण्याकामी शासकीय गणेवेशात हजर असलेले पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी यांची कॉलर अचानक चिंग्याने पकडली व तुम्ही पोलीस माझे काहीच वाकडे करू शकत नाहीख मी आत्ताच खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटून आला आहे. मी तुम्हा सर्वांना बघून घेईन. मला आताच्या आता बाहेर सोडा, असे चिंग्या मोठ्याने ओरडू लागला. या झटापटील पोलीस नाईक कोळी यांच्या शर्टाचे वरील बटण व नेमप्लेट तुटली तसेच त्याच्या नखाचे ओरखडे लागले. या घटने प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !