जळगावातील दांडेकर नगरात धाडसी घरफोडी : सव्वा लाखांचा ऐवज लंपास
Daring house burglary in Dandekar town of Jalgaon जळगाव : शहरातील दांडेकर नगरातील कार्तिक पार्क भागातील बंद घरातून भर दिवसा चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोकड मिळून एक लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री 10 वाजता रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भर दिवसा घरफोडीने खळबळ
सुमेध पंडित माधव नेतकर (52, रा.कार्तिक पार्क, दांडेकर नगर, जळगाव) हे परीवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकररदार आहेत. शुक्रवार, 21 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी दीड वाजे दरम्यान त्यांचे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी घराचा दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण एक लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. दुपारी दीड वाजता नेतकर हे घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघड झाला. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री 10 वाजता अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.


