कंडारीत जुन्या वादातून तुंबळ हाणामारी : परस्परविरोधात गुन्हे
Clashes erupt from old disputes in Kandari: Crimes against each other नशिराबाद : जळगाव तालुक्यातील कंडारी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना शनिवार, 22 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे नशिराबाद पोलिसात दाखल करण्यात आले.
पहिल्या गटाची तक्रारी :l पाच संशयितांविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील कंडारी गावातील सेवालाल महाराज यांच्या मंदीराच्या ओट्यावर बादल लक्ष्मण परदेशी आणि त्याचा शेजारी राहणारा शेखर जैसवाल जाधव हे दोघेजण रविवारी सायंकाळी सा वाजता गप्पा मारत बसले होते. त्यावेळी गावातील संशयित प्रशांत पाटील, मयुर सुर्वे, सुनील सुर्वे, हर्षल बाविस्कर आणि अक्षय राजेंद्र पाटील यांनी येवून जुन्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून बादल परदेशी आणि शेखर जाधव यांना अश्लिल शिवीगाळ करून मारहाण करीत जातीवाचक शिविगाळ केली तसेच भांडण सुरू असतांना बादलचा भाऊ आकाश परदेशी, आई कुसुमबाई परदेशी, जिजाबाई राजू मोरे, गंगूबाई पुनमसिंग मोरे यांना देखील पाचही जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली.
या प्रकरणी बादल लक्ष्मण परदेशी आणि त्याचा शेजारी राहणारा शेखर जैसवाल जाधव यांनी दिलेल्या वेगवेगळ्या दोन फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रशांत पाटील, मयुर सुर्वे, सुनील सुर्वे, हर्षल बाविस्कर आणि अक्षय राजेंद्र पाटील (सर्व रा. कंडारी, ता.जि.जळगाव) या पाच जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गजानन देशमुख करीत आहे.


