उपचार सुरू असलेल्या अनोळखी महिलेचा मृत्यू
Death of unidentified woman undergoing treatment जळगाव : शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असलेल्या 50 वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजता घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव शहरातील नेरी नाकाजवळील एस.टी.डेपो वर्क शॉपजवळ एक अनोळखी महिला अत्यवस्थ अवस्थेत आढळल्याने स्थानिक नागरीकांच्या मदतीने तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 16 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेची कोणतीही ओळख पटलेली नव्हती. वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना रविवारी सकाळी नऊ वाजता महिलेचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तपास हवालदार नितीन पाटील करीत आहे.


