दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने जळगावात माय-लेकीला मारहाण


Mother and daughter beaten up in Jalgaon for not paying for drinking जळगाव : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या वादातून तरुणाने माय-लेकीला मारहाण केली. ही घटना शाह नगरातील इंदिरानगरात रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाविरोधात शहर पोलिसात गुन्हा
हमीदाबी पीरन शेख (72, शाहू नगर, इंदिरा नगर, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी शमीम बी.शेख पीरन त्यांच्यासोबत वास्तव्याला आली आहे. रविवारी, 23 एप्रिल रोजी रोजी सकाळी 9 वाजता हे घरात झोपलेले असताना संशयित समीर जाफर शेख जलील उर्फ दिवाणा हा दारू पिवून आणखी दारु पिण्यासाठी पैसे मागायला त्यांच्या घरी आला. त्यावेळी शमीम बी.शेख यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने त्यांच्या कपाळावर धारदार वस्तूने मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यांचा वाद सोडविण्यासाठी वृद्ध महिला हमीदाबी पीरन शेख आल्यानंतर त्यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिसात संशयित समीर जाफर शेख जलील या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाई धनराज निकुंभ करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !