अज्ञात वाहनाच्या धडकेने वाघोद्यातील दुचाकीस्वार ठार


Bike rider killed in Waghoda collision with unknown vehicle सावदा : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने वाघोद्यातील 32 वर्षीय ठार झाला. हा अपघात रावेर-वाघोदा रस्त्यावर रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी सावदा पोलिसात अज्ञात वाहन धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. युनूस इतबार तडवी (32, वाघोदा बुद्रुक, ता.रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

अपघातानंतर वाहन चालक पसार
युनूस तडवी हा आई, पत्नी व दोन मुलांसह रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे वास्तव्याला होता. शेतात केळी मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होतो. रविवार, 23 एप्रिल रोजी युनूस हा दैनंदिन कामाच्या निमित्ताने सायंकाळी सहा वाजता दुचाकी (एम.एच.19 बी.बी.395) ने सासरी वडगाव येथे गेला असता परतीच्या प्रवासात वाघोदा-रावेर रस्त्यावरील बाळू श्रावण महाजन यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने युनूसच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक हा वाहन घेवून पसार झाला.

पोलिसात वाहन चालकाविरोधात गुन्हा
अपघातानंतर युनूसचे काका हमीद हसन तडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता पुतण्याचा मृतदेहपाहून हंबरडा फोडला. रावेर ग्रामीण रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला. याप्रकरणी हमीद तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मयत युनूसच्या पश्चात आई जैनब तडवी, पत्नी काजल आणि दोन मुले असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !