यावल शहरात बसमध्ये चढताना महिलेची पर्स चोरट्यांनी लांबवली


यावल : यावल एस.टी.आगारात चोपडा बसमध्ये बसतांना एका महिलेची पर्स गहाळ लांबवण्यात आली. महिलेने या नंतर तत्काळ पोलिसांना सूचित करताच संपुर्ण प्रवाशांची तपासणी करण्यात आली मात्र पर्स सापडली नाही. इतर प्रवासावेळी पर्स हरवली असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर बस मार्गस्थ करण्यात आली.

अर्धा तास प्रवाशांचा खोळंबा
यावल एसटी आगारातुन यावलहू चोपडा जाणार्‍या बस मध्ये घोडसगाव येथील महिला प्रवासाकरीता बसली व अचानक महिलेस आपली पर्स आपल्या जवळ नसल्याचे समजले व त्यांनी तात्काळ आगार व्यवस्थापक डी.बी. महाजन यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तत्काळ पोलिसांना सूचित करताच हवालदार मोहन तायडे, ज्ञानेश्वर कोळी, रामचंद्र सपकाळे, सोनल कोळी, अकाश कोळी, अनिल घाडगे, कैलास तेली पथकासह दाखल झाले व त्यांनी बसमध्ये बसलेल्या संपुर्ण प्रवाशांची झडती घेतली मात्र पर्स मिळून आली नाही. तक्रारदार महिलेने दुसर्‍या बसमध्ये प्रवासा दरम्यान पर्स गहाळ झाली असावी, असे सांगितल्याने बस पुढे मार्गस्त झाली. या प्रकारात प्रवाशांचा अर्धा तास वेळ वाया गेला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !