शिरसोलीतील ग्रामपंचायत सदस्यावर चॉपरने हल्ला : दोघांना अटक
Chopper attack on village panchayat member in Shirsoli : Two arrested जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील प्रशांत हॉटेल येथे ग्राहक व हॉटेल मालकात सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणार्या शिरसोलीतील ग्रामपंचायत सदस्य नितीन अर्जून बुंधे (34) यांच्यावर चॉपरहल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. अजय विजू भिल व किरण कोळी (दोन्ही रा.शिरसोली) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
वादातील मध्यस्थीनंतर हल्ला
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ जळगाव रस्त्यावर असलेल्या प्रशांत हॉटेलमध्ये जेवणाचे बिल देण्यावरून हॉटेल मालक याचे अजय विजू भिल आणि किरण कोळी यांच्यात शनिवार, 22 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता वाद सुरू होता. हे भांडण सुरू असल्याचे पाहून नितीन बुंधे यांनी मध्यस्थी केल्याचा राग संशयित अजय विजू भिल आणि किरण कोळी यांच्यासह इतर अनोळखी दोन जणांना आल्याने त्यांनी कमरेतून चॉपर काढून नितीन बुंधे यांच्यावर वार केला. जखमी झालेल्या बुंधे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रविवारी रात्री 9 वाजता संशयित आरोपी अजय विजू भिल आणि किरण कोळी यांच्यासह इतर दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अजय भिल व किरण कोळी या दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास हवालदार जितेंद्र राठोड करीत आहे.


