किया मोटर्सच्या डिलरशीपचा बहाणा : रावेरच्या प्रौढाला साडेपाच लाखांचा गंडा


Kia Motors Dealership Pretext : Five and a half lakhs to an adult of Raver रावेर : बर्‍हाणपूर शहरात किया मोटर्सयची डिलरशीप मिळवून देण्याच्या आमिषाने रावेर तालुक्यातील मोरगावच्या प्रौढाला तब्बल साडेपाच लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी दोघा भामट्यांविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे भामट्यांनी ई मेलद्वारे संदेश साधून ही फसवणूक केली.

ई मेलवर साधला संदेश
रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्दचे रहिवासी विजय एकनाथ पाटील यांच्या ई मेलवर संशयित अशोक पांडे व धरणीधर पाटील नामक भामट्यांनी 81811-28953 व 94778-65406 या क्रमांकावरून संपर्क साधत ई मेल पाठवता व तुम्हाला बर्‍हाणपूर शहरात किया मोटर्सची डिलरशीप मिळवून देण्याचे आमिष दाखवले. भामट्यांच्या गोड बोलण्यावर पाटील यांनी विश्वास ठेवत आरटीजीएसच्या माध्यमातून साडे पाच लाख रुपये पाठवले. हा प्रकार 22 ते 28 मार्चदरम्यान घडला मात्र त्यानंतरही डिलरशी न मिळाल्याने व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विय पाटील यांनी जळगाव सायबर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !