दक्षिणेत पाचशे रुपयांची नोट देत घातली भूरळ : वरणगावातील महिला पूजार्‍याचे दोन लाखांचे दागिने लांबवले


Two lakh jewelery of female priest in Varangaon was stolen भुसावळ : तालुक्यातील वरणगाव शहरातील भोगावती नदी पात्रालगतच्या रेणूका माता मंदिरात दर्शनार्थ आलेल्या भामट्याने मंदिरातील वयोवृद्ध महिला पूजार्‍याला पाचशे रुपयांची दक्षिणा देत तुमच्या अंगावरील सोने काढून देवीच्या पायाला लावा व नंतर पिशवीतून काढा म्हणत भुरळ घालून आठ तोळे वजनाचे व दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे लांबवल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुरळ घालत दागिने लांबवले
वरणगाव शहरातील भोगावती नदी पात्रालगत भाविकांचे श्रध्दास्थान पुरातन रेणूका मातेचे मंदिर आहे. या मंदिरात पूजा-अर्चना गावातीलच शालिनी रघुनाथ जोशी (85, रंगारी गल्ली, वरणगाव) या करतात. रविवार, 23 सकाळी साडेआठ वाजता 35 वर्षीय संशयित मंदिरात दर्शनानिमित्ताने आला. यावेळी जोशी यांच्या हाती पाचशे रुपयाची नोट देवून ती मातेच्या चरणाला स्पर्श करून तुम्ही दक्षिणा म्हणून पिशवीत ठेवा, असे सांगिल्यानंतर जोशी यांनी तसे केले व त्यानंतर भामट्याने जोशी यांच्या अंगावरील दागिण्यांची चौकशी करून ते पाहण्यासाठी घेतले व यावेळी महिलेला भुरळ घालून गळ्यातील सोन्याची चैन व हातातील सोन्याच्या पाटल्या असे आठ तोळ्याचे दागिणे लांबवले. संशयीताने तोंडाला रूमाल बांधल्याने त्याचा चेहरा स्पष्ट झालेला नाही. पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनी घटनास्थळी जावून सविस्तर माहिती जाणून घेतली. जोशी यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !