जळगावात पुन्हा धाडसी घरफोडी : 50 हजारांचा ऐवज चोरीला
Daring burglary again in Jalgaon : 50 thousand stolen जळगाव : शहरातील गेंदालाल मिल परीसरात बंद घर फोडून सुमारे 50 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
अय्युब दिलावर खान हे आपल्या परीवारासह गेंदालाल मिल परीसरात वास्तव्याला आहेत. अय्युब दिलावर खान हे ईद साजरी करण्यासाठी मुंबई येथे नातेवाईकांकडे गेल्यानंतर घर बंद असल्याची संधी पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून टिव्ही, सोन्याच्या वस्तू आणि 35 हजारांची रोकड असा एकूण 50 हजारांचा ऐवज लांबवला, अल्तमश खान हा मंगळवार, 25 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता गेंदालाल मिल येथील वडीलांच्या घरी गेला असता त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. आत जावून पाहणी केली तर घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त दिसून आल्या. त्याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


