सुसाईड नोट लिहत जळगावात ट्रॅफिक वॉर्डनची आत्महत्या
Jalgaon traffic branch warden commits suicide by hanging himself : Four people are responsible for the death जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी व जळगाव शहर वाहतूक शाखेत ट्रॅफिक वॉर्डन असलेल्या तरुणाने सुसाईड नोट लिहत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उमेश एकनाथ ठाकूर (37) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येस चार लोक कारणीभूत असून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने टोकाचे पाऊल उचलत असून त्यात कुटूंबाचा संबंध नसल्याचा उल्लेख तरुणाने चिठ्ठीत केला आहे.
चिठ्ठी लिहित आत्महत्या
रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ उमेश ठाकूर हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. बुधवारी दुपारी ठाकुर यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. मृतदेह खाली उतरवून त्याला तत्काळ जिल्हा रूग्णालयात वाहनातून हलवल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपाासणीअंती उमेश यांना मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांसह मित्र मंडळींची रुग्णालयात एकच गर्दी करीत मोठा आक्रोश केला. तरुणाच्या पँटच्या खिश्यामध्ये सुसाईड नोट मिळून आली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मयताच्या पश्चात आई-वडील, भाऊ, विवाहित बहिण, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परीवार आहे. तपास अल्ताफ पठाण करीत आहे.


