अमळनेर तालुका दुहेरी खून : संशयित आरोपींची कोठडीत रवानगी ; आंदोलकांविरोधातही गुन्हा


Amalner Taluka Double Murder : Suspects sent to custody; A crime against protesters too अमळनेर : अमळनेर शहरासह तालुक्यातील सावखेडा येथे झालेल्या दुहेरी खून प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. संशयीतांना बुधवारी अमळनेर न्यायालयात हजर केल्यानंतर महिला संशयीतांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर पुरूष आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दुहेरी खुनाने तालुका हादरला
अमळनेरातील दाजीबा नगरात स्पीकरचा आवाज कमी करण्यावरून वाद उद्भवल्याने चाकूचे वार करीत अक्षय राजू भील (18) या तरुणाची हत्या करण्यात आली तर सावखेडा येथे नाना मंगलसिंग बारेला (21) या तरुणाची मारहाण केल्याच्या रागातून कुर्‍हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली होती.

150 आंदोलकांविरोधात गुन्हा
अमळनेर शहरातील दाजीबा नगरात अक्षय भिल या तरुणाच्या खूनानंतर समाजबांधव आक्रमक होवून रस्त्यावर उतरले होते व धुळे महामार्गावर सुमारे अडीच ते तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे, दंगल, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, अश्लील शिवीगाळ करणे, कायदा पायदळी तुडवणे, पोलिसांना कुचकामी समजणे हा प्रकार घडला होता. आंदोलनकर्त्यांचे विविध प्रकारचे कृत्ये सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाले असून या प्रकरणी नाईक दीपक शांताराम माळी यांच्या फिर्यादीवरून आंदोलनात नेतृत्व करणारे विकास भील, गणेश त्र्यंबक भील, त्र्यंबक राजाराम भील, भैय्या भील यांच्यासह सुमारे 150 जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक राकेश परदेशी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !