जामनेर तालुक्यातील महिलेचा विनयभंग : त्रिकूटाविरोधात गुन्हा
molestationof woman in Jamner taluka : Crime against trio जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावात राहणार्या 35 वर्षीय महिलेच्या घरात घुसून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
जामनेर तालुक्यातील एका गावात 35 वर्षीय महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 23 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता महिला ही घरी असतांना गावातील संशयित प्रकाश दशरथ भील, लिलाबाई दशरथ भील, भारत दशरथ भील (सावरला, ता.जामनेर) अनधिकृतपणे घरात प्रवेश करीत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर एकाने महिलेचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल.े य प्रकरणी संशयीतांविरेधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रीयाज शेख करीत आहे.


