जुन्या वादातून दोनगावात माय-लेकास मारहाण : पाच संशयीतांविरोधात गुन्हा
धरणगाव : जुन्या वादातून तालुक्यातील दोनगाव येथे माय-लेकास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बुधवारी सायंकाळी सात वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जुन्या वादातून मारहाण
सुरज राहुल पाटील (21, दोनगाव खुर्द, ता.धरणगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. गावातील जुन्या भांडणाच्या कारणावरून सोमवार, 24 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता सुरज पाटील याला गावातील शिवदास विश्वास पाटील, समाधान गोकुळ पाटील, विष्णू गोकुळ पाटील, गोकुळ संतोष पाटील, विश्वास संतोष पाटील (सर्व रा. दोनगाव खुर्द, ता.धरणगाव) यांनी लोखंडी रॉड डोक्यात टाकून जखमी केले. तसेच सुरजची आई ज्योती पाटील यांनादेखील अश्लिल शिवीगाळ करीत तोंडावर मारण्यात आली. या प्रकरणी सुरज पाटील यांच्या तक्रारीवरून वरील पाचही संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय चौधरी करीत आहे.


