जळगावातील विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता


Married woman with two children missing from Jalgaon जळगाव : शहरातील राजमालती नगरातील विवाहिता आपल्या दोन चिमुकल्यांसह बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बुधवारी 26 एप्रिल रोजी शहर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली.

अचानक विवाहिता झाली बेपत्ता
शारदा मिथून जाधव व अनमोल (8) व रुपेश (5) अशी बेपत्ता झालेल्या मायलेकांची नावे आहेत. मिथून डिगंबर जाधव (32, दुध फेडरेशन, राजमालती नगर, जळगाव ) हे पत्नी शारदा व दोन मुलांसह वास्तव्यास असून हमाली काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी पहाटे सहा वाजता मिथून हे नेहमीप्रमाणे कामाला गेल्यानंतर पत्नी शारदा ही अनमोल आणि रूपेश यांना सोबत घेवून कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली. जातांना शेजारी राहणार्‍या उषाबाई याच्याकडे घराची चावी त्यांनी दिली तर दुपारी तीन वाजता मिथून हे घरी जेवणासाठी आल्यानंतर त्यांना घराला कुलूप दिसले तसेच उषाबाई यांच्याकडून चावी घेतल्यानंतर घरात स्वयंपाकदेखील केलेला नव्हता.

शहर पोलिसात हरवल्याची नोंद
मिथून यांनी पत्नी शारदा आणि दोन्ही मुलांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवार, 26 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता जळगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली. तपास महिला पोलीस नाईक स्वप्नाली सोनवणे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !