हिंगणे पिंप्री येथे तरुणावर प्राणघातक हल्ला : पंधरा संशयितांविरोधात गुन्हा


Assault on youth in Hingane Pimpri : Case against 15 suspects पहूर :  शेतातील मका कापताना संशयित आढळल्यानंतर यापूर्वीदेखील तूच मका कापला, असे सांगितल्याचा रागातून 15 जणांनी हिंगेणे येथील तरुणावर प्राणघातक हल्ला करीत डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले तर कुटूंबातील सदस्यांनाही शिविगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

मका चोरीचा जाब विचारल्याने हल्ला
मयूर मंगलसिंग पाटील (21, हिंगणा पिंप्री, ता.जामनेर) या तरुणाच्या तक्रारीनुसार, मंगळवार, 25 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास गावातील प्रल्हाद दगडू काळे हा मयूर पाटील यांच्या शेतातील मका कापून नेत असताना सापडल्याने त्यास गेल्या महिन्यापासून शेतातील मका तूच चोरून नेत असेल, असे सांगितल्यानंतर संशयितांनी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास 14 संशयितांना सोबत आणत बेकायदेशीररीत्या घरात प्रवेश केला तसेच प्रल्हाद काळे याने लोखंडी रॉडसह चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच मयुरला वाचविण्यासाठी आलेल्या काकू पुजा गोकुळ पाटील, कविता मंगलसिंग पाटील, आजी शकुंतला मुक्त्यारसिंग पाटील, वडील मंगलसिंग पाटील यांनी सोडवण्याा प्रयत्न केला असता त्यांनादेखील शिविगाळ व मारहाण करण्यात आली. हा प्रकार घडल्यानंतर मयुर पाटील याने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर प्रल्हाद दगडू काळे व राहूल राजू भोर व अन्य 13 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाल. तपास हावलदार किरण शिंपी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !