शिरपूरातील अभियंता तरुणीचा बसमध्ये विनयभंग : चोपडा शहरातील आरोपीला अटक


Young engineer molested in Shirpur bus : Accused arrested in Chopra city शिरपूर : शिरपूर-चोपडा बसमध्ये प्रवास करणार्‍या अभियंता तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी एहसान अहमद शेख सादीक (चोपडा, जि.जळगाव) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गर्दीचा फायदा घेत अश्लील वर्तन
परजिल्ह्यातील 23 वर्षीय वर्षीय शिरपूरात शिक्षण घेत असून नातेवाईकांसह ती मंगळवारी दुपारी एक वाजता शिरपूर-चोपडा बस (एम.एच40 एन.9041) मधून प्रवास करीत असताना संशयीत एहसान अहमद शेख सादीक याने गर्दीचा फायदा घेत तरुणीच्या हातासह पायाला स्पर्श केला. याबाबत प्रवाशानी देखील संशयीत युवकास समजावले मात्र तरीदेखील संशयीताने गर्दीचा फायदा घेत वारंवार दुष्कृत्य केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीताल अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !