मोरगाव गावात वीज चोरी : सात जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा
यावल : रावेर तालुक्यातील मोरगाव येथे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरांविरोधात धडक मोहिम राबवण्यात आली. त्यात सात जण वीज चोरी करतांना आढळून आल्यानंत संबंधिताना दंडात्मक नोटीस बजावण्यात आली मात्र त्यानंतरही दंड भरण्यात न आल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सात संशयीतांविरोधात गुन्हा
राज्य विद्युत वितरण कंपनी खिरवड कक्षाचे सहाय्यक अभियंता गौरव बाविस्कर सह पथकाने मोरगाव, ता.रावेर या गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. यात नरेंद्र विश्वनाथ पाटील, शैलेंद्र वसंतराव पाटील, बंडू छगन कुंभार, युनूस दगडू जामलकर, कैलास रामराव कोळी, अरुण हसन जामलकर व चंदू छगन कुंभार हे सात जण वीज चोरी करतांना आढळल्याने त्यांना चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून नोटीस बजावण्यात आली मात्र या सात जणांनी दंड न भरल्याने सात जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता गौरव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळ हे करीत आहे.
