जळगावातील ट्रॅफिक वॉर्डनची आत्महत्या : शेजारच्यांविरोधात गुन्हा
Suicide of traffic warden in Jalgaon : Crime against neighbours जळगाव : जळगावातील ट्रॅफिक वॉर्डन तरुणाने शेजारचांच्या त्रासाला कंटाळून रामेश्वर कॉलनीत आत्महत्या केली होती. या प्रकरणी शेजारच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उमेश एकनाथ ठाकूर (37) या तरुणाने सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवार, 26 एप्रिल रोजी दुपारी घडल्यानंतर गुरूवारी रात्री उशीरा पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या आरोपींविरोधात गुन्हा
उमेश ठाकूर हा आई, वडील पत्नी व दोन मुलांसह रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ वास्तव्याला होता. घराशेजारील किशोर रमेश तिरमल, गजानन रमेश तिरमल, श्यामसुंदर रमेश तिरमल, रूखमा रमेश तिरमल आणि माधुरी गजानन तिरमल (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) यांनी वेळावेळी मनासिक त्रास दिला तसेच न्यायालयात सुरू असलेली केस मागे घेण्यासाठी वारंवार धमकी दिल्याने या त्रासाला कंटाळून उमेश याने सुसाईड नोट आत्महत्या केली होती.
बुधवार, 26 एप्रिल रोजी दुपारी हा प्रकार समोर आल्यानंतर यापूर्वी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आी तर गुरूवार, 27 एप्रिल रोजी रात्री उशीरा मयत उमेश ठाकूरची पत्नी हेमलता ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर रमेश तिरमल, गजानन रमेश तिरमल, श्यामसुंदर रमेश तिरमल, रूखमा रमेश तिरमल आणि माधुरी गजानन तिरमल (सर्व रा.रामेश्वर कॉलनी) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.


