जामनेरातून अल्पवयीन तरुणीला पळवले
जामनेर : जामनेर शहरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
मैत्रिणीसोबत तरुणी आल्यानंतर घटना
जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील स्वामी रेडियम दुकानाजवळ 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही मैत्रीणीसोबत शुक्रवार, 27 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता लस्सी पिण्यासाठी दुकानावर आली असता अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी कारण सांगून फूस लावून अपहरण केले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा जामनेर शहरातील बाजारात शोध घेतला परंतु कुठेही तरुणी न आढळल्याने जामनेर पोलीस ठाण्यात सायंकाळी सात वाजता धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल वाटे करीत आहे.


