रीक्षा उलटल्याने चालकासह दोन विद्यार्थी जखमी


Two students along with the driver were injured when the rickshaw overturned पहूर : दहावीच्या खासगी क्लाससाठी पहूर येथे जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या रीक्षासमोर अचानक कुत्रे आडवे येताच भरधाव रीक्षा उलटल्याने चालकासह दोन विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी पहूर गावानजीक घडला. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

कुत्रे आडवे येताच रीक्षा उलटली
याबाबत अधिक माहिती अशी की, नववीच्या वर्गातून दहावीच्या वर्गात गेलेल्या लोंढरी गावातील विद्यार्थ्यांनी पहुर येथे खाजगी क्लास लावला आहे. या क्लाससाठी जामनेर तालुक्यातील लोंढ्री गावातील विद्यार्थी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता लोंढ्री येथून पहूर येथे जाण्यासाठी निघाल्यानंतर रस्त्यात कुत्रे आडवे जाताच रीक्षा उलटली. या अपघातात रीक्षा चालक ईश्वर रंगनाथ हिवरकर (34) तसेच विद्यार्थी मानसी युवराज बोरसे (15) व प्रतीक संजय पडाळे (15, सर्व रा.लोंढ्री, ता.जामनेर) हे जखमी झाले. जखमींना तातडीने खाजगी वाहनाने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !