तपतकठोरा येथून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
भुसावळ : तालुक्यातील तपतकठोरा येथे चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दवाखान्याजवळून लांबवली दुचाकी
सोपान उत्तम कोळी (47, ओझरखेडा, ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी दुचाकी (एम.एच.19 ए.झेड.1542) ही तपतकठोरा येथील सरकारी दवाखान्याजवळ लावली होती मात्र चोरट्यांनी संधी साधून बुधवार, 26 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकी लांबवली. तपास नाईक नावेद अली सैय्यद करीत आहेत.
