विवरा शिवारात भरधाव दुचाकीने उडवल्यो मेंढपाळ महिला गंभीर
निंभोरा : विवरा शिवारातील लिंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या मेंढपाळ महिलेला भरधाव दुचाकीने उडवल्याने महिला जखमी झाल्याची घटना 18 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
ताबाबाई सुकलाल नेमाने (50, मुंजलवाडी, ता.रावेर) या मंगळवार, 18 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास विवरा शिवारातील लिंबाच्या झाडानजीक उभ्या असताना भरधाव दुचाकी (एम.एच.19 डी.सी.0946) ने धडक दिल्याने महिलच्या डोक्याला व उजव्या हाता-पायाला जखमी झाली. या प्रकरणी वरील क्रमाांकाच्या दुचाकीवरील अज्ञाताविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक राजेंद्र काशीनाथ पाटील करीत आहेत.
