भुसावळ बाजार समितीत परिवर्तन : आमदार संजय सावकारे किंगमेकर ; आमदार एकनाथराव खडसे यांना धक्का
भुसावळ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी एकत्र येत भुसावळातील भाजपाचे स्थानिक आमदार संजय सावकारे यांच्याविरोधात लढा दिला मात्र या निवडणुकीत परिवर्तन घडले असून आमदार संजय सावकारे हिरो ठरले आहे. या निवडणुकीत भाजपला पंधरा तर विरोधकांना केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. ‘शेतकरी विकास’ या अजेंड्यावर लढण्यात आलेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला साथ देत बाजार समितीत परीवर्तन घडवले. आमदार खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासाठी ही बाब धक्कादायक मानली जात आहे.

