मुक्ताईनगरातील हरवलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला ; घातपाताचा संशय
Body of missing person found in Muktainagar; Accident suspected मुक्ताईनगर : शहरातील गौतम देवचंद बोदडे (65, आंबेडकरनगर, ता. मुक्ताईनगर) हे 27 रोजी हरवल्यानंतर त्यांचा शोध सुरू असतसनाच त्यांचा मृतदेह मुक्ताईनगर शेती शिवारातील तुकाराम मधुकर खडसे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली आढळल्याने खळबळ उडाली आहे. घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
गुरुवार, 27 रोजी बोदडे हरविल्याची नोंद मुक्ताईनगर पोलिसात दाखल करण्यात आली होती. गौतम बोदडे यांचा नातू अभय कुवरसिंग बोदडे (रा.आंबेडकरनगर) यांनी दिलेल्या खबरीनुसार, गौतम देवचंद बोदडे हे बुधवार, दि. 26 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेनंतर बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू होता व याबाबत पोलिसात हरवल्याची नोंदही करण्यात आली मात्र त्यांचा मृतदेह 28 रोजी मुक्ताईनगर शिवारातील तुकाराम खडसे यांच्या शेतात निंबाच्या झाडाखाली आढळला. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहु करीत आहे. दरम्यान मयताचा मोबाईल मृतदेहापासुन लांब आढळुन आला. याबाबत घातपाताचा संशय कुटुंबियांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.
