यावल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा झेंडा ; जाणून घ्या विजयी उमेदवार
15 जागांवर विजय : जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे सह पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांचा पराभव
यावल : यावल कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा, शिवसेना, रीपाइं, आठवले गट महायुती प्रणित सहकार पॅनलने तब्ब्ल 15 जागांवर दणदणीत विजय मिळवला तर महाविकास आघाडीला तीन जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीच्या अत्यंत नवख्या उमेदवारांनी मातब्बरांना मात दिली तर मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार लता सोनवणे व युवा नेते अमोल हरीभाऊ जावळे यांनी पॅनलचे नेतृत्व करीत पॅनलला विजय मिळवून दिला.
निसटता पराभव
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांना (293) मते मिळाली. अवघ्या तीन मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. एका मतपत्रिकेवर शेखर पाटील यांनी आक्षेप घेतल्याने या मतदार संघासाठी फेर मतमोजणी करण्यात आली. शेखर पाटील यांनी 25 हजार रुपये फि भरल्यानंतर फेर मतमोजणीत ते मत ग्राह्य धरण्यात आले. मतमोजणी प्रक्रिया येथील पंचायत समिती कार्यालयात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.एफ.चव्हाण होते. निकालानंतर कार्यकर्त्यांनी अमोल जावळे यांना खांद्यावर घेत जल्लोष केला.

विजयी उमेदवार व मिळालेली मते अशी
भाजपा-शिंदे गट शिवसेनेचे हर्षल गोविंदा पाटील (311), दीपक नरोत्तम चौधरी (310), उमेश प्रभाकर पाटील (308), राकेश वसंत फेगडे (299), सागर राजेंद्र महाजन (294), पंकज दिनकर चौधरी (289), संजय चुडामन पाटील (282), नारायण शशिकांत चौधरी (394), कांचन ताराचंद फालक (351), राखी योगराज बर्हाटे (332), उज्जैनसिंग भाऊलाल राजपूत (324), दगडू उर्फ बबलु जनार्दन कोळी (325), यशवंत माधव तळेले (321), विलास चंद्रभान पाटील (297), सूर्यभान निंबा पाटील (296) तर महाविकास आघाडीचे अशोक त्र्यंबक चौधरी (188), सैय्यद युनूस सैय्यद युसूफ (167), सुनील वासुदेव बारी (440) विजयी झाले.
