जळगावात दरोड्यापूर्वीच पाच संशयित रामानंद पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : गावठी पिस्टल, चाकूसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना रामनंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खुशाल विनोद पांडे, नागेश प्रल्हाद सोनार, मयुर उर्फ विक्की दिपक आलोणे, दुर्गेश उर्फ पपई आत्माराम सन्यासी आणि वसीम हुसेन पटेल (सर्व रा.जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दरोड्यापूर्वीच आरोपी जाळ्यात
जळगाव शहरातील कोल्हे नगर परीसरातील शिव कॉलनीच्या शंभर फुटी रस्त्यावरील प्रतीक पार्क अपार्टमेंट नजीक हे पाचही जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असतांनाच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या. रविवार, 30 रोजी पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून तीन हजार रुपये किंंमतीचा गावठी कट्टा, एक हजार रुपये किंमतीची गुप्ती, दोन चाकू, हेक्सा ब्लेड, मिरची पावडर, रूमाल, सूती दोरी आदी दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.


