लाखो रुपये किंमतीचा ट्रक जळगावातून चोरीला


A truck worth lakhs of rupees was stolen from Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉपवर उभा असलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवार, 29 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा
भगवान दिवसांत चौधरी (45, देवपूर, धुळे) यांचा मालकीचा ट्रक (एम.एच.18 ए.ए.8465) हे 21 मार्च 2022 रोजी दुपारी दोन वाजता जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉपवर लावला होता. अज्ञात चोरट्यांनी संधी साधून ट्रक लांबवला. संदर्भात ट्रक मालक भगवान चौधरी यांनी न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. अखेर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शनिवारी रात्री 10 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !