अश्लील कृत्य करीत महिलेचा विनयभंग : पतीला ठार मारण्याची धमकी
Woman molested by performing obscene acts : Threat to kill husband जळगाव : जळगाव तालुक्यातील एका गावातील महिलेसोबत अश्लील कृत्य करीत तिचा विनयभंग केल्यानंतर महिलेसह तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताविरोधात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील एका गावात 27 वर्षीय महिला आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. गुरुवार, 27 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता महिलाही घरी एकटी असताना गावातील संशयित गणेश रघुनाथ सोनवणे याने अनधिकृतरीत्या घरात प्रवेश करीत महिलेशी अंगलट केली व महिलेचा विनयभंग केला. तुझा पती खूप माजला आहे, ही घटना जर कोणाला सांगितली तर तुला व तुझ्या पतीला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने शनिवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने संशयित आरोपी गणेश रघुनाथ सोनवणे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू पाटील करीत आहे.



