अवकाळी पावसासह गारपीटीने 500 मेंढ्या दगावल्या : जामनेर तालुक्यातील प्रकार
Hailstorm with unseasonal rain kills 500 sheep : Case in Jamner taluka जामनेर : तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे सलग सुरू असलेल्या अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्यानंतर खोकरमळा जंगलात सुमारे पाचशे हून अधिक मेंढ्या दगावल्याने धनगर बांधवांचे सुमारे 90 लाखांचे आर्थिक नुकसान झाले. या घटनेने सहा धनगर बांधवाचे संसार उघड्यावर आले आहेत. प्रशासनाने या कुटूंबाला भरपाई देण्याची अपेक्षा आहे.
अवकाळी मार असह्य
अवकाळी पावसाचा मोठा फटका बळीराजाला बसला आहे. त्याचप्रमाणे मेंढपाळ आणि पशुपालकांनाही या अवकाळीमुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. भगवान सदाशिव कोळेकर (रा.नांदगाव, जि.नाशिक) यांच्यासह सहा बांधवाचा मेंढरांचा वाडा पिंपळगाव गोलाईत शिवारात उतरला होता. यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने वाडावरील मेंढ्या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या तर काही गारपीटीच्या मारामुळे दगावल्या आहेत. घटनास्थळी तालुका प्रशासन अधिकारी व कर्मचार्यांनी धाव घेत पाहणी केली.


