जळगावात दुचाकी चोरीचे सत्र कायम : रेल्वे स्थानकाबाहेरून दुचाकी लांबवली
Session of two-wheeler theft continues in Jalgaon : Two-wheelers were recovered from outside the railway station
जळगाव : शहरातील रेल्वे स्टेशनच्या पार्कींगच्या बाहेर रस्त्यावरून महावितरण कंपनीच्या कर्मचार्याची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी सोमवारी सायंकाळी सात वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
किशोर विठ्ठल पवार (29, खोटे नगर, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून महावितरण कंपनीत वायरमन आहेत. शनिवार, 29 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता किशोर पवार हे आपल्या दुचाकी (एम.एच.19 डी.ए.2501) ने जळगाव रेल्वे स्थानक येथे खाजगी कामानिमित्त आले असता दुचाकी रेल्वेस्टेशनच्या पार्किंगच्या बाहेर दुचाकी पार्क केली मात्र चोरट्याने संधी साधली. दुचाकी कुठेही मिळून न आल्याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर सोमवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.


