गाडी घेण्यासाठी दोन लाख न आणल्याने जळगावातील विवाहितेचा छळ : पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा
जळगाव : जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या विवाहितेने गाडी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये न आणल्याने तिचा छळ करण्यात आला. या प्रकरणी सोमवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर येथील माहेर असलेल्या सोनाली चेतन चौधरी (28) हिचा विवाह जळगाव तालुक्यातील आसोदा येथील चेतन भास्कर चौधरी यांच्याशी झाला असून लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेने माहेरहून दोन लाख रूपये मोठी गाडी घेण्यासाठी आणावे, अशी मागणी करण्यात आली परंतु विवाहितेने पैसे न आणल्याने तिला मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पैसे आणले नाही म्हणून सासू, सासरे, नणंद यांनी छळ करण्यास सुरूवात केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी आसोदा येथे निघून आल्या.
याप्रकरणी सोमवारी रात्री आठ वाजता विवाहितेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने पती चेतन भास्कर चौधरी, सासरे भास्कर रामा चौधरी, सासू उज्वला भास्कर चौधरी, देवयानी भास्कार चौधरी (सर्व रा.आसोदा), नणंद सपना सचिन पाटील, सचिन किरण पाटील (दोन्ही रा.अयोध्या नगर, जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.


