जळगावातील प्रौढाचा नशिराबादनजीक दुचाकी अपघातात मृत्यू
जळगाव : नशिराबाद गावाजवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ दुचाकी अपघातात मेहरूण येथील प्रौढाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. दिलीप विश्वनाथ देवरे (57, मेहरूण, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत माहिती कळू शकली नाही.
फर्निचर व्यावसायीकाच्या मृत्यूने हळहळ
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील मेहरूण येथे दिलीप देवरे हे आई, पत्नी व मुलासोबत वास्तव्याला होते. फर्निचरचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मंगळवार, 2 मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ते जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ दुचाकीने येत असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघात कसा घडला याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान, स्थानिक नागरीकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन महाजन यांनी मृत घोषीत केले. मयताच्या पश्चात आई कमलबाई, पत्नी जयाबाई, मुलगा गणेश आणि विवाहित मुलगी असा परीवार आहे.


