जळगाव बसस्थानकातून महिलेचे 69 हजारांचे दागिणे लांबवले


A woman’s jewelery worth 69 thousand was stolen from Jalgaon bus stand जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव येथील महिलेचे शहरातील नवीन बसस्थानक आवारातील एसटी वर्क शॉपजवळून चोरट्यांनी पर्समधून 69 हजारांचे दागिने लांबवल्याने खळबळ उडाली आहे. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत यापूर्वी देखील चोर्‍या झाल्यानंतर त्यांचा तपास लागत नसताना सातत्याने चोर्‍या होत असल्याने महिलावर्गात घबराट पसरली आहे. या प्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
सुनीता मधुकर ठाकूर (35, किनगाव, ता.यावल, ह.मु.नवी मुंबई) या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहेत. मंगळवार, 2 मे रोजी दुपारी चार वाजता सुनीता ठाकूर या बाहेरगावी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या बसस्थानक आवारातील एसटी वर्कशॉप येथील गेटजवळ उभ्या असताना चोरट्यांनी पर्समधील 66 हजार रुपये किंमतीची मंगलपोत, तीन हजार रुपये किंमतीचा लक्ष्मीहार असा एकूण 69 हजारांचा ऐवज लांबवला. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महेंद्र पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !