जळगावात तरुणाला मारहाण : दोघांविरोधात गुन्हा


Beating up a youth in Jalgaon : Crime against both जळगाव : शहरातील शाम नगर येथे तरुणाला दोन जणांनी मारहाण करत डोक्यात लोखंडी पट्टी मारुन दुखापत केली. ही घटना मंगळवार, 2 मे रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारण नसताना केली मारहाण
जळगाव शहरातील खोटेनगरात प्रमोद मधुकर सैंदाणे (34) हा तरुण राहतो. मंगळवारी सकाळी 11 वाजता प्रमोद हा गिरण पंपींग ते वाघनगर दरम्यान शामनगर येथे असतांना याठिकाणी संशयित अजय कोळी व सोनू कोळी या दोन जणांनी शिवीगाळ करत दमदाटी करीत मारहाण केली. दोघांनी प्रमोद यांच्या डोक्यात लोखंडी पट्टी मारुन दुखापत केली. या घटनेत प्रमोद हा जखमी झाला असून त्याच्या तक्रारीवरुन अजय कोळी व सोनू कोळी या दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !