भरधाव दुचाकीच्या धडकेत चांगदेवचा तरुण ठार


A young man from Changdev was killed in a collision with a speeding bike मुक्ताईनगर : दोन भरधाव दुचाकींमध्ये झालेल्या धडकेने चांगदेव येथील 35 वर्षीय तरुण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात चांगदेव गावाजवळील वढवे फाट्यासमोर घडला. अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप शिवाजी पाटील (35, चांगदेव, ता.मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

दुचाकीच्या धडकेने युवक ठार
संदीप शिवाजी पाटील हा तरुण 19 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता त्याचा मित्र तुषार प्रमोद पाटील यांच्यासोबत दुचाकी (एम.एच.19 डी.के.8962) ने जात असताना मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे फाट्यासमोर रामदास महाराज यांच्या शेतासमोर समोरून येणारी भरधाव दुचाकी (एम.एच.19-0151) वरील चालक पंकज वंजारी याने जोरदार धडक दिल्याने संदीप शिवाजी पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास उपचारार्थ दरम्यान मृत्यू झाला तर मागे बसलेला तुषार पाटील हा जखमी झाला. अपघात घडल्यानंतर दुचाकीधारक हा दुचाकीस पसार झाला. अपघात प्रकरणी संशयित आरोपी पंकज वंजारी यांच्या विरोधात मयत संदीप यांच्या बहिण शीतल संजय हटकर (30, हरीविठ्ठल नगर, जळगाव, ह.मु.चांगदेव) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !