लाकडाची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची अचानक उलटली ट्रॉली : चोपड्यातील दुचाकीस्वार ठार


Bike rider killed after tractor trolley overturns : Deceased resident of Krishnapur चोपडा : लाकडाची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक उलटल्यानंतर लाकडे दुचाकीस्वाराच्या अंगावर पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू ओढवला. हा अपघात चोपडा-चुंचाळे रस्त्यावर शहरापासून दोन किमी अंतरावर बुधवारी रात्री 8..30 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात सुकलाल केना बारेला (35, कृष्णापूर, ता.चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अचानक उलटली ट्रॉली
चोपडा-चुंचाळे रस्त्यावर लाकूड भरून वाहतूक करणारे ट्रॅक्टर जात असताना त्याच्या पाठीमागे चोपडा शहरात बाजार करून घराकडे दुचाकी (एम.एच.04 जी.के.6147) ने जात असताना अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली व ट्रॉलीतील लाकडे बारेला याच्या अंगावर पडल्याने तो जागीच ठार झाला. बारेला यास उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.प्रसाद पाटील यांनी खबर दिल्यावरून चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार जितेंद्र सोनवणे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !