जळगावात जीएमसीत शिशुंची अदला-बदली : चौकशी समितीने नोंदवले जवाब


Swap of GMC babies in Jalgaon: Answer reported by inquiry committee जळगाव : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात शिशूंची चुकीच्या निरोपानंतर अदलाबदली झाली व त्यानंतर संतप्त पालकांनी गोंधळ घातल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून चौकशी समितीने दोन्ही शिशूंच्या पालकांसह संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली. दरम्यान, पोलिसांच्या परवानगीनंतर आता डीएनए चाचणी केली जाणार आहे.

स्टाफसह पालकांचे नोंदवले जवाब
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी प्रसूतीनंतर पालकांना निरोप देताना झालेल्या गैरसमजातून दोन नवजात शिशूंची अदलाबदल झाली होती. या नंतर संतप्त पालकांनी गोंधळ घालत भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला होता. दरम्यान, प्रशासनाने दोन्ही बाळांना ताब्यात घेतले असून अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. या प्रकरणी विभागप्रमुख डॉ. सत्यवान मोरे यांच्या अध्यक्षतेखाली चार वैद्यकीय अधिकार्‍यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीने बुधवारी बैठक घेतली. तसेच त्यावेळी प्रसूती विभागातील पूर्ण स्टाफसह नवजात शिशूंच्या पालकांचे देखील जबाब घेण्यात आलेत. याप्रकरणी आता ज्या पालकांना रुग्णालयाचा निर्णय मान्य नाही, त्यांनी पोलिसात तशी तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या शिफारशीनुसार डीएनए परवानगी मिळू शकेल. त्यानंतर चाचणी केली जाणार असल्याची माहिती डॉ. विजय गायकवाड यांनी दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !