अमळनेरला यात्रोत्सवात महिलेच्या गळ्यातील मंगलपोत लांबवली


अमळनेर : अमळनेर शहरातील सखाराम महाराज यात्रोत्सवात भाविकांची गर्दी वाढल्याचे पाहून चारेट्यानी महिलेच्या गळ्यातील 12 हजार रुपये किंमतीची पोत लांबवली. या प्रकरणी बुधवारी रात्री 10 वाजता अज्ञात चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
अमळनेर शहरात संत सखाराम महाराज मंदिर संस्थांच्या वतीने रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रथोत्सव सुरू असताना मीना रवींद्र सोनवणे (40, रा. कुंभारटेक, अमळनेर) यांच्या गळ्यातील 12 हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगलपोत अज्ञात चोरट्याने तोडून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिला मीना सोनवणे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !