धरणगावच्या इंदिरा कन्या शाळेजवळून भामट्यांनी दुचाकी लांबवली


धरणगाव “: शहरातील इंदिरा कन्या शाळेजवळून तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या संदर्भात बुधवारी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
किशोर कैलास माळी (24, रा.दोंदवाडे, ता.धुळे) हा तरुण जळगाव धरणगाव शहरात इलेक्ट्रिशीयनचे काम करतो. किशोर माळी कामाच्या निमित्ताने 25 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता दुचाकी (एम.एच.18 एफ.398) ने धरणगाव शहरात आल्यानंतर त्याने दंदिरा कन्या शाळेजवळ दुचाकी पार्क केली मात्र चोरट्यांनी संधी साधली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर किशोर माळी याने बुधवारी तक्रार दिल्यानंतर अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !