धरणगावातील तरुणावर प्राणघातक हल्ला : तिघांविरोधात गुन्हा


Assault on youth in Dharangaon : Crime against three धरणगाव : शहरातील 22 वर्षीय तरुणावर तिघांनी प्राणघातक हल्ला करीत लोखंडी सळईने मारहाण केली. ही घटना बुधवार, 3 रोजी रात्री 9.50 वाता घडली. या प्रकरणी गुरुवारी धरणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
रुपेश सुधाकर चौधरी (22, बीएसएनएल ऑफिसजवळ, धरणगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. बुधवार, 3 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास रुपेश चौधरी हा घरी असताना त्याला एकाचा फोन आला होता. त्यावेळी त्याला फोनवर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर राकेश दगडू पाटील, हितेश दगडू पाटील (दोन्ही रा.हेडगेवार नगर) व ब्रह्मा कैलास धनगर (रा.धनगर गल्ली, धरणगाव) या तिघांनी रुपेश चौधरी यांच्या घरी येऊन त्याला बेदम मारहाण केली. त्यावेळी रुपेशचे मित्र अनिकेत, निलेश, आकाश आणि राहुल हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनादेखील धक्काबुक्की केली. या लोखंडी सळईने वार केल्याने रुपेश चौधरी यांच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली. त्याला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरुवारी रात्री 9 वाजता रुपेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नाना ठाकरे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !