चाळीसगावात जुगाराचा डाव उधळला : आठ जुगारी जाळ्यात


Gambling scheme foiled in Chalisgaon : eight gamblers in the net चाळीसगाव : शहरात रंगात आलेला जुगाराचा डाव शहर पोलिसांनी उधळत आठ जुगारींना अटक करीत त्यांच्याकडून 16 हजार 200 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी रात्री सव्वाअकरा वाजता करण्यात आली. या कारवाईने जुगार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगावचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार नितेश पाटील, भूषण मांगो पाटील, विनोद आहे. विठ्ठल भोई, हवालदार शरद पाटील, नंदकिशोर महाजन, समाधान पाटील, आशुतोष सोनवणे यांच्या पथकाने मॉडर्न डेअरीमागे सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकत इम्तियाज हुसेन मिर्झा (42, रेल्वे स्टेशन मशीदजवळ, चाळीसगाव), बबलू महेबूब शेख (30, नगरपालिका मंगल कार्यालयाजवळ, हुडको, चाळीसगाव), अफरोज अल्ताफ शेख गुलाम मोहम्मद (32, पीर मुसा कादरीनगर, चाळीसगाव), गणेश सोनवणे (24, भडगावरोड, अभिनव शाळेसमोर, चाळीसगाव), सागर वसंतराव गरजे (32, शनी मंदिराजवळ, रिंगरोड, चाळीसगाव), कामरान बेग हुसेन बेग मिर्झा (39, पवारवाडी, चाळीसगाव), विशाल दिलीप परदेशी (26, पवारवाडी, चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले. नासीर उर्फ अप्पी हुसेन मिर्झा (पवारवाडी, चाळीसगाव) हा जुगार चालविणारा असल्याने त्याच्यासह आठ संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !