प्रौढाच्या नाकावर मारला लोखंडी रॉड : जळगावातील दोघांविरोधात गुन्हा
An iron rod was hit on the nose of an adult : a crime against two people in Jalgaon जळगाव : घरगुती वादातून शहरातील रामेश्वर कॉलनीत प्रौढाला दोघांनी लोखंडी रॉड मारुन दुखापत केली. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
कौटुंबिक वादातून घटना
रामेश्वर कॉलनीत राजेंद्र अर्जुन चौधरी (48) हे वास्तव्यास असून त्यांचा रामेश्वर कॉलनीतच राहणार्या निवृत्ती रामा चौधरी व भारती अर्जुन चौधरी यांच्यासोबत घरगुती वाद आहे. या वादातून निवृत्ती चौधरी व भारती चौधरी या दोघांनी शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राजेंद्र चौधरी यांच्या भांडण करत त्यांच्या नाकावर लोखंडी रॉड मारुन दुखापत केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर रात्री साडेअकरा वाजता जखमी राजेंद्र चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर निवृत्ती चौधरी व भारती चौधरी या दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार संजय धनगर करीत आहेत.


