फर्दापूरच्या युवकाचा अपघाती मृत्यू
Accidental death of Fardapur youth पहूर : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात फर्दापूर, ता.सोयगाव येथील 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा अपघात शेंदूर्णी-चिंचोली रस्त्यावर रविवारी दुपारी दोन वाजता घडला. ईश्वर जोतमल चव्हाण (32, फर्दापूर, ता.सोयगाव) असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
अज्ञात वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध
ईश्वर चव्हाण हा तरुण रविवारी दुपारी शेंदुर्णी येथून चिंचोलीकडे जात असतांना दुपारी दोन वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ईश्वर हा गंभीर जखमी झाल्यानंतर त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर श्रावण चव्हाण (फर्दापूर) याने पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील करीत आहे.


