भुसावळात तलवारीच्या धाकावर दहशत : एकास अटक
भुसावळ : शहरातील वांजोळा रोडवरील स्टार लॉन परिसरात सार्वजनिक जागी तलवार घेऊन फिरतानाा आनंद दिनेश खरारे (रा. वाल्मीक नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. संशयीत युवक हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यनंतर सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहायक फौजदार तस्लीम पठाण, किशोर महाजन, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी व गजानन वाघ यांनी प्रत्यक्ष जाऊन कारवाई आरोपीच्या ताब्यातून तलवार जप्त करण्यात आली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध आर्म अॅक्टनुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.


